मुंबई -राज ठाकरे यांचा आज जन्म दिवस असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यानिमित्ताने अनेक समाज उपयोगी कार्यक्रम मनसे पक्षातर्फे होत आहेत. यावेळी बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
'महापालिकांसाठी मनसेची प्रचंड तयारी' -
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, 'येत्या महापालिकांसाठी मनसेची प्रचंड तयारी झाली आहे. कोरोना काळानंतर राज ठाकरे यांचे झंझावाती दौरे सुरु होतील,' असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले हाती -
वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जनतेला कशात आनंद आहे, ते करण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज ठाकरेंना महाराष्ट्राबद्दल, देशाबद्दल कळकळ आहे. येत्या महानगरपालिका आणि इतर निवडणुकांची प्रचंड तयारी झाली आहे,' असे त्यांनी सांगितले.
'कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर राज ठाकरे पडणार बाहेर' -
'महाराष्ट्रातील लोकांच्या समस्यांचे राज ठाकरे सतत चिंतन, मनन करत असतात. त्यांनी पक्ष स्थापन केला, त्यावेळी राज ठाकरे यांनी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण केले. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकांसाठी प्रचंड तयारी केली आहे. कोविडमुळे ते थोडे थांबले आहेत. ते जिथे जातील तिथे गर्दी होते. त्यामुळे ते बाहेर पडले नाहीत. मात्र, कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर ते बाहेर पडणार आहेत,' असं बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे.