महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mitali Thackeray Pregnent : शिवतीर्थावर लवकरच गोड बातमी, राज ठाकरे होणार आजोबा - मिताली ठाकरे गर्भवती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( Raj Thackeray ) सून मिताली ठाकरे ( Mitali Thackeray Pregnent ) या गरोदर असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर लवकरच पाळणा हलणार असल्याच्या चर्चा आहेत.

Mitali Thackeray Pregnent
Mitali Thackeray Pregnent

By

Published : Mar 1, 2022, 3:17 PM IST

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ( Raj Thackeray ) सून मिताली ठाकरे ( Mitali Thackeray Pregnent ) या गरोदर असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर लवकरच पाळणा हलणार असल्याच्या चर्चा आहेत. एप्रिल महिन्यात या नवीन सदस्याचा जन्म होणार असल्याची माहिती आहे.

अमित ठाकरेंवर राजकीय व कौटुंबिक जबाबदारी -

मिताली ठाकरे यांचं सासर व माहेर दोन्ही मुंबईत असल्याने बाळाचा जन्म देखील मुंबईतच होईल. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे व मिताली बोरुडे हे 2019 साले विवाह बंधनात अडकले होते. या लग्नाला देशातील अनेक बड्या नेत्यांनी व प्रतिष्ठित व्यक्ती यांनी उपस्थिती लावली होती. एका बाजूला अमित ठाकरे बाबा होणार आहेत ही जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला अमित ठाकरे यांच्या वरती मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र निर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे काहीच दिवसात अमित ठाकरे यांच्यावर राजकीय व कौटुंबिक जबाबदारी वाढणार आहे. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात सक्रिय होत असलेले अमित ठाकरे या दोन्ही जबाबदाऱ्या कशा पार पाडणार हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा -Pravin Darekar on Nawab Malik : महाविकास आघाडी सरकारचा नवाब मालिकांना वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न - प्रवीण दरेकर

ABOUT THE AUTHOR

...view details