मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राजभवन येथे जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. वाढीव वीज बिले कमी करण्या संदर्भात सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, यासंदर्भात ठाकरे यांनी कोश्यारी यांना निवेदन दिले आहे. यावर कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना वीजबिल प्रश्नी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा सल्ला दिला आहे. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून वीज बिल प्रश्नी होणाऱ्या दिरंगाईवर सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, संदीप देशपांडे आदी उपस्थित होते.
वीज वितरण कंपन्याकडून टोलवा टोलवी -
या भेटीनंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले, राज्यातील वाढीव वीज बिलाचा प्रश्न काही दिवसांपासून प्रलंबित आहे. त्या संदर्भात आमचे पदाधिकारी सरकार आणि वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटले होते. मात्र, त्यावर काही तोडगा निघाला नाही. वीज वितरण कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, त्यांनी वीज बिल कमी करण्याचा मुद्दा हा एनईआरसीच्या मान्यतेनंतरच सोडवला जावू शकतो, असा दावा केला. त्यावर आमचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वात एक शिष्ठमंडळ एनईआरीसीच्या अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, त्यांनी हा प्रश्न वीज वितरण कंपन्या स्वत: सोडवू शकतात असे स्पष्ट केले. त्यामुळे वीज वितरण कंपन्याकडून टोलवा टोलवी केली जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
या वीज बिल प्रश्नी राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशीही आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, नितीन राऊत यांनी लवकरात लवकरात निर्णय घेऊ याशिवाय दुसरे काही आश्वासन दिले नाही. सरकारकडून जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
राज्यपालांनी सांगितले पवार साहेबांशी बोलून घ्या...