मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Raj Thackeray ) यांचे सुपुत्र अमित ठाकरे ( MNS Amit Thackeray ) यांच्यावर प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली ( MNS Student Chief Amit Thackeray ) आहे. आदित्य ठाकरेंच्या धर्तीवर अमित ठाकरेंना राजकारणात प्रस्थापित करायचे आहे. आदित्य ठाकरे यांनीही शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून राजकीय इनिंगला सुरुवात करत मोठे यश संपादन केले आहे.
तरुणांमध्ये आकर्षण
अमित ठाकरेंबद्दल तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवल्यास मोठ्या संख्येने मराठी तरुण मनसेमध्ये सामील होतील, असा मनसेचा दावा आहे. आगामी 10 प्रमुख महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांची नियुक्ती मनसेसाठी सुद्धा महत्वाची असणार आहे.