महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

...अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारा, राज ठाकरेंचा तबलिगींवर हल्लाबोल

मरकझमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला ? असा सवाल उपस्थित करत राज यांनी तबलिगींवर हल्लाबोल केला.

राज ठाकरे
राज ठाकरे

By

Published : Apr 4, 2020, 11:39 AM IST

Updated : Apr 4, 2020, 11:54 AM IST

मुंबई - मरकझमध्ये जो प्रकार घडला तो दुर्दैवी आहे. अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर त्यांना संपवा अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तबलिगींवर हल्लाबोल केला आहे. मुंबईत कृष्णकुंजवर पत्रकारांबरोबर ते बोलत होते.

मरकझमध्ये जेजे सहभागी झाले होते त्यांच्यावर उपचार कशासाठी करत आहात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या सर्वांचे उपचार तातडीने थांबबावेत. या सर्वांना एकाच वार्डमध्ये आणून संपवले पाहीजे. हेच लोक बाहेर पडून लोकांवर, भाजीपाल्यांवर थुंकत आहे. नर्स समोर नग्न फिरत आहेत. अश्लिल हावभाव करत आहेत. ही घाणेरडी प्रवृत्ती ठेचली पाहजे. अशा लोकांना भर रस्त्यात फोडून काढले पाहीजे. ऐवढेच नाही तर त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले पाहीजेत असेही ते म्हणाले.

मुस्लिम समाजात काही वाईट प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे असे मत राज यांनी व्यक्त केले. लॉक डाऊन तात्पूरता आहे त्यानंतर देशात आम्हीच आहोत असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणात कोणताही आशेचा किरण दिसला नाही. त्यांनी सध्याच्या स्थितीवर बोलालया हवे होते पण तसे झाले नाही. लोकांनीही नियमांचे पालन करावे. तसे होताना दिसत नाही. जर अशीच स्थिती राहीली तर लॉकडाऊन वाढवावे लागेल. याचा फार मोठा फटका सर्वांनाच बसणार आहे. उद्योगधंदे बंद होतील, रोजगार निघून जातील, सरकारचा महसूल बुडेल सर्व काही ठप्प होईल. त्यामुळे सर्वांनी आत्ताच नियम पाळावेत, घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन राज यांनी केले. पोलिसांवर काही ठिकाणी हल्ले होत आहेत. अशा लोकांना फोडून काढले पाहीजे असे मत त्यांनी व्यक्त केले. वसईतील तबलिगींच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारणाऱ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचे त्यांनी यावेळी कौतूक केले.

Last Updated : Apr 4, 2020, 11:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details