महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांना वाहिली श्रद्धांजली - Ahmed Patel passes away

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर सर्वच राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Tribute to Ahmed Patel
अहमद पटेल यांना श्रद्धांजली

By

Published : Nov 25, 2020, 5:09 PM IST

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा - पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..

पटेल यांच्याविषयी राज ठाकरे यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे अल्पशा आजारानंतर निधन झाले. पटेल चाणाक्ष, बुद्धिमान नेते होते. राजकारणाला बुद्धिबळाच्या पटावर ठेवून डाव-प्रतिडाव खेळण्यात ते माहीर होते. पण ही असाधारण क्षमता त्यांनी राजकीय लढाया जिंकण्यापुरतीच वापरली, तिला कधी त्यांनी व्यक्तिगत हेवेदावे ह्यासाठी वापरले नाही. त्यामुळेच या खंडप्राय देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

हेही वाचा - कामगार संघटनांच्या २६ नोव्हेंबरच्या देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा - बाळासाहेब थोरात

राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा एखाद्याशी स्नेह तयार झाला, की त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यातील सुखदुःखांच्या प्रसंगात ते ठाम उभे राहत याचा अनुभव मी देखील घेतला आहे.

अहमद पटेल यांना श्रद्धांजली

४३ वर्ष सक्रिय राजकारणात राहून, अहमद पटेल यांचे निवासस्थान अनेक सत्तांतराचे केंद्रस्थान होऊनदेखील स्वतः सत्तेच्या पदांच्या मोहात न पडणे हा गुण दुर्मीळच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ अहमद पटेल ह्यांना विनम्र श्रद्धांजली अशा भावना राज यांनी व्यक्त केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details