मुंबई:अंधेरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठिंबा देईल, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या समर्थनार्थ थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना Deputy Chief Minister Devendra Fadnavisn पत्र लिहिले आहे. त्यावर फडणवीस यांनी या पत्राचा विचार केला जाईल असे सांगितल्याने या निवडणुकीसंदर्भात नवीन राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे. ]
पत्र राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं पटेल यांचं ? अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, ऋतुजा पटेल आमदार होतील हे पहावं, असे आवाहन राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केले आहे. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र यांनीही प्रत्युत्तर दिले असून राज ठाकरेंनी केलेल्या मागणीचा विचार करू. मात्र, याबाबत पक्षात चर्चा करावी लागेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन या निवडणुकीत त्यांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती केली. परंतु त्यांनी पत्र लिहून आम्ही आमचा उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे.
परंतु या संदर्भात मला माझ्या वरिष्ठांशी व सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करावी लागेल. परंतु यापूर्वी आर. आर. पाटील असतील किंवा विधान परिषदेच्या यंदाच्या दोन निवडणुका असतील, त्या आम्ही बिनविरोध करण्यास परवानगी दिली. परंतु त्यासाठी समोरच्यांनी आमच्याबरोबर चर्चा केली होती. तशी विनंती आम्हाला केली होती. परंतु या निवडणुकीत कोणीही आम्हाला भेटले नाही व तशी आपल्याला विनंती केली नाही, म्हणून हा प्रश्न मार्गी लागला नाही. परंतु राज ठाकरे यांच्या पत्राने भाजप उमेदवार मुरजी पटेल यांचे टेन्शन वाढलं आहे, यात काही शंका नाही.
सामना बाळासाहेब ठाकरेंचा राहिलेला नाही ? राज ठाकरे यांनी जरी चांगल्या भावनेने पत्र लिहिले असले, तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घ्यावा लागेल असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. भाजप या प्रकरणांमध्ये राजकारण करत आहे, असे ठाकरे गटाच्या सामनामधून आरोप करण्यात आलेला आहे. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामनाला सध्या कोणीच विचारत नाही व तुम्ही पत्रकारांनी सुद्धा असे प्रश्न मला विचारू नयेत. सामना हा आता बाळासाहेब ठाकरे यांचा राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.