मुंबई - राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पितृपक्षामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती घोषित केली नव्हती. मात्र, घटस्थापनेचा मुहूर्त सर्वच राजकीय पक्ष प्रचारासाठी साधत आहेत. त्याच अनुषंगाने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यलयाचे उद्घाटन केले.
घटस्थापनेचा मुहूर्त साधत राज ठाकरेंनी केले मनसे कार्यालयाचे उद्घाटन - MNS NEWS
घटस्थावनेचा मुहूर्त साधत राज ठाकरे यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातील मनसे कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यांनी प्रचाराचा नारळ विठोबा रुख्मीणीच्या वडाळा नगरीत फोडला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
राज ठाकरे यांनी घटस्थापनेचा मुहुर्त साधत विठोबारुख्मीणीच्या वडाळा नगरीत मनसेच्या प्रचाराचा नारळ फोडला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा आणि राज ठाकरे यांचा झंझावात दिसेल.