महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray in Shivaji park : राज ठाकरे नातू कियानला कडेवर घेऊन शिवाजी पार्कमध्ये, नागरिकांशी साधला संवाद - shivaji park dadar

गुरूवारी रात्री राज ठाकरे यांचे शिवाजी पार्कमध्ये सहकुटुंब सहपरिवार दादरमधील शिवाजी पार्कवर ( shivaji park dadar )शतपावली करताना दिसले. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे त्यांचा नातू कियान सोबत पार्कमध्ये ( Raj Thackeray in Shivaji park with grandson kiyan ) दिसले. दरम्यान पार्कवर जमलेल्या दादर करांशी राज ठाकरे यांनी दिलखुलास संवाद साधला आहे.

Raj Thackeray in Shivaji park
राज ठाकरे नातू कियानला कडेवर घेऊन शिवाजी पार्कमध्ये

By

Published : Oct 14, 2022, 9:55 AM IST

मुंबई : राजकीय नेते म्हणून वावरणारे राज ठाकरे हे वेगळ्या भूमिकेत असल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी रात्री सोशल मीडियावर अचानक राज ठाकरे यांचे फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली. त्याचे कारण देखील तसंच होतं. नेहमीच आपल्या कुटुंबाला वेळ देणारे राज ठाकरे पहिल्यांदाच सहकुटुंब सहपरिवार दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शतपावली करताना दिसले. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा नातू कियान त्यांच्या ( Raj Thackeray in Shivaji park with grandson kiyan) कडेवर होता.

नागरिकांसोबत दिलखुलास संवाद- सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये राज ठाकरे यांच्या कडेवर त्यांचा नातू कियान ठाकरे असून त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे व त्यांची सून मिताली ठाकरे देखील आहेत. राज ठाकरेंना त्यांच्या कुटुंबासोबत एकत्र पाहून त्यांचे फोटो आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी त्यांच्या अनेक जणांनी गर्दी केली होती. राज ठाकरे यांनी देखील तिथे जमलेल्या सर्व नाकरिकांशी दिलखुलास संवाद साधला.

दादरकरांना लाभला संधी- दरम्यान, आपल्या भाषणांमध्ये नेहमीच विरोधकांचा समाचार घेत तर कधी आपल्या व्यंगचित्रांमुळे तर कधी त्यांच्या चित्रपट समीक्षेमुळे राज ठाकरे नेहमीच चर्चेत असतात. 'राज ठाकरे हा एक कला प्रेमी, कला जोपासणारा आणि कलाकारांना प्रोत्साहन देणारा राजकारणी आहे' असं त्यांच्याबद्दल नेहमीच म्हटले जाते, असे राज ठाकरे आपल्या कुटुंबासमवेत एकत्र फार कमी दिसतात. आपली मुलं, पत्नी आणि नातवंड असा एकत्र राज ठाकरेंचा फॅमिली फोटो मिळणे तसेच दुर्मिळच. पण, हा दुर्मिळ फोटो टिपण्याची संधी काल रात्री दादरकरांना मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details