मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-भाजप सरकार ( Shinde BJP Government ) स्थापन झाले. शिंदे-भाजर सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्या मंत्रिमंडळ विस्तारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंची वर्णी लागण्याची चर्चा सध्या रंगली ( Shinde BJP Government Offers Amit Thackeray Maharashtra Cabinet ) आहे. मात्र, यावरती आता राज ठाकरेंची स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व बातम्या खोट्या असल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली ( Raj Thackeray Denied News Amit Thackeray Maharashtra Cabinet ) आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ( 15 जुलै ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मुंबईतील दादर येथील ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. राज ठाकरे यांच्यावर गेल्या महिन्यात लीलावती रुग्णालयात हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर फडणवीस यांची ठाकरें सोबतची ही पहिलीच भेट आहे.
'त्या बातम्या खोट्या' -राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केले जाऊ शकते, अशी चर्चा होती. मात्र, देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्यानंतर राज ठाकरेंनी या वृत्तांचे खंडण केलं आहे. 'या सर्व बातम्या खोट्या आहेत,' असे स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं आहे. तसेच, या बैठकीत आगामी नागरी निवडणुका, विशेषत: बीएमसी निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता असलेल्या बीएमसीच्या सत्तेवर भाजपची नजर आहे.