महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'महाराष्ट्राचे रुतलेले अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी वाईन शॉप सुरू करा'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात मद्यविक्री सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्याचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी वाईन शॉप्स सुरू करण्यायृत यावे, असे मत त्यांनी मांडले आहे.

wine shops in maharashtra
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात मद्यविक्री सुरू करण्याची मागणी केली आहे.

By

Published : Apr 23, 2020, 3:13 PM IST

Updated : Apr 23, 2020, 3:44 PM IST

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात मद्यविक्री सुरू करण्याची मागणी केली आहे. राज्याचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी वाईन शॉप्स सुरू करण्यायृत यावे, असे मत त्यांनी मांडले आहे. यासाठी राज यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तळीरामांच्या सोयीसाठी नाही, तर आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी याची अंमलबजावणी करण्यात यावी, असा उल्लेख पत्रात आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त अन्य सर्व सेवा बंद करण्यात आल्या. यामध्ये मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर अनेक ठिकाणी दारू विक्री सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. राज्यभरात वाईन शॉप्समध्ये चोरी झाल्याचे प्रकार समोर आले. तसेच काही ठिकाणी अनधिकृतपणे मद्यविक्री सुरू आहे.

राज्याच्या तिजोरीत मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होतो. मद्यविक्री थांबल्याने सरकारला या महसूलावर पाणी सोडावे लागले. तसेच राज्यभरातील उद्योगधंदे बंद असल्याने अर्थव्यवस्था देखील खालावली आहे. या पार्श्वभूमीवर महसूलातील घट भरून काढण्यासाठी मद्यविक्री पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली आहे. लॉकडाऊनचा हॉटेल व्यवसायिकांना बसलेला फटका देखील त्यांनी अधोरेखित केलाय. छोटे हॉटेल्स तसेच खानावळी देखील पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी केलीय.

Last Updated : Apr 23, 2020, 3:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details