महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'दिवे, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता' - राज ठाकरेंची नरेंद्र मोदींवर टीका

कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पंतप्रधानांच्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनाबरोबरच इतर अनेक विषयांवर भाष्य केले.

raj thackeray criticises pm narendra modi
राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी

By

Published : Apr 4, 2020, 12:51 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील वीज बंद करून दिवे, मेणबत्ती, टॉर्च लावा किंवा मोबाईल फ्लॅश दाखवण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी, 'लोक 9 मिनिटे मेणबत्त्या लावतीलही. पंरतु, मोदींच्या भाषणात लोकांना आशेचा किरण दिसायला हवा होता. लोकांना समाधान वाटले असते. देश म्हणून कुठे चाललो आहोत, हे त्यातून कळायला हवे होते' अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. कृष्णकुंज या राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांनी आज पत्रकारांशी संवाद सांधला.

हेही वाचा...CORONA VIRUS : अंधारातून प्रकाशाकडे..5 एप्रिलला रात्री 9 वाजता लाईट बंद करून घरोघरी दिवे लावा, मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला राज ठाकरे यांनी थेट विरोध केला नाही. मात्र ते म्हणाले की, 'पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार लोक दिवे पेटवतीलही. नाहीतरी लोकांना सध्या काही काम नाही. त्यात श्रद्धा असू शकते आणि दिवे लावल्यामुळे करोनावर काही परिणाम झाला तर चांगलेच आहे. पण, पंतप्रधानांच्या भाषणातून काहीतरी आशेचा किरण दिसायला हवा होता,' अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली.

हेही वाचा......अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारा, राज ठाकरेंचा तबलिगींवर हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details