महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Raj Thackeray Amit Shah will meet राज ठाकरे आणि अमित शहा भेटीची शक्यता; राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांची भेटीने नवीन युतीची चर्चा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवीन निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर ( BJP Leaders Currently Holding Rally on Shivtirtha ) सध्या भाजप नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. राज ठाकरे यांच्या घरातील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde Meet Raj Thackeray at Shivtirtha ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray ) यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे काही महत्त्वाचे नेते गेले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या होणाऱ्या राज ठाकरे भेटीची चर्चादेखील राजकीय वर्तुळात चालू ( Raj Thackeray Amit Shah will meet ) आहे. भाजपच्या इतर बड्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी लावलेल्या हजेरीनंतर राजकीय वर्तुळात मनसे आणि भाजप युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

Raj Thackeray Amit Shah will meet
राज ठाकरे आणि अमित शहा भेटीची शक्यता

By

Published : Sep 2, 2022, 2:35 PM IST

मुंबई गणपती दर्शनाच्या निमित्ताने Occasion of Bapa Darshan at at Raj Thackeray House गेल्या दोन दिवसांत राज ठाकरे यांच्या घरी मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde Meet Raj Thackeray at Shivtirtha ), उपमुख्यमंत्री Deputy CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी उपस्थिती लावली Imp Leders of BJP Present at Raj Thackeray House होती. गेल्या काही दिवसांत घेण्यात आलेल्या या भेटीमुळे होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी राज्यात नवीन युती होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतीर्थावर भाजप नेत्यांची मांदियाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांचे नवीन निवासस्थान असलेले शिवतीर्थावर सध्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळते. राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपल्या नवीन घरी बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. राज ठाकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे काही महत्त्वाचे नेते गेले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी लावलेल्या हजेरीनंतर राजकीय वर्तुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

नितीन गडकरींसह भाजपच्या बड्या नेत्यांची राज ठाकरेंच्या घरी हजेरीगणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधीही राज ठाकरे यांच्या घरी भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेत यांची भेट घेतल्याने होऊ घातलेल्या महानगरपालिकेचे निवडणुकांमध्ये भाजप मनसे युती होणार असे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

भाजपकडून मनसेसोबत युतीचे संकेतगेल्या काही दिवसांतच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्यातल्या गाठीभेटी वाढत आहे. राज ठाकरेंच्या घरी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या जवळपास सहा महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 ऑगस्टला राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात वैचारिक साम्य असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे होऊ घातलेल्या महानगरपालिकेचे निवडणुकांसाठी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, असे कयास आता लावले जात आहे.

भाजप-मनसे युती होण्याची शक्यता या अगोदरसुद्धा भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या होत्या. मात्र, त्या वेळेस झालेल्या निवडणुकांच्या दरम्यान युती होऊ शकली नव्हती. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे गट अशी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी युती होण्याची शक्यता आहे. यातून मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना शिकस्त देण्यासाठी खास रणनीती ही आखली जाईल, असे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पूर्व यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबतची भूमिका महत्त्वाची मात्र राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत घेतलेली आधीची भूमिका पाहता त्यावर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ युतीसाठी तयार होतील का? यावरदेखील प्रश्नचिन्ह आहेत. मात्र काही कारणास्तव भारतीय जनता पक्ष आणि मनसेची युती न झाल्यास महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेकांना पूरक अशी भूमिका घेऊन छुपी युती ही केली जाऊ शकते असे संकेत प्रवीण पुरो यांनी दिली आहेत.

मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा मुंबई दौराया वेळी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला महापालिकेवर आपली सत्ता कोणत्याही परिस्थितीत आणायची आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेतृत्व आणि राज्यातील मुख्य नेतृत्वही कामाला लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी ते मुंबईत येत असले तरी, त्यांचा हा दौरा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.

अमित शहा दौऱ्यामध्ये करणार महाराष्ट्र भाजप नेत्यांशी चर्चाया दौऱ्यात राज ठाकरे यांच्यासोबत युतीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच, एकनाथ शिंदे त्यांची मदत घेऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवरून भाजपने खाली खेचले. मात्र, शिवसेनेची ताकद असलेली मुंबई महानगरपालिकादेखील यांच्याकडून घेण्यासाठी अमित शहा या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही भेटमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ही भेट केवळ सदिच्छा भेट होती. राज ठाकरे यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आपल्याला यायचे होते. मात्र, काही कारणास्तव त्या वेळी यायला जमले नसल्याने गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, यावेळी काही जुन्या आठवणींना राज ठाकरे आणि आपल्याकडून उजाळा देण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या विचारांच्या सान्निध्यात आम्ही सर्व जण मोठे झालोबाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या सान्निध्यात आम्ही सर्व जण मोठे झालो आहोत, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरून पायउतार करताना उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेले असल्याचा आरोप सातत्याने एकनाथ शिंदे करीत आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाकडून ही सातत्याने बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, अशी वक्तव्ये केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांचा विचारांचा मुद्दा घेऊ दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, असे कयास लावले जात आहे.

युतीबाबत अंतिम निर्णय राज ठाकरे घेतीलहोऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळावा. यासाठी जवळपास सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. सध्या भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे गट यांच्याकडून राज ठाकरे यांच्या सुरू असलेल्या गाठीभेटी या वैयक्तिक आहेत. यामध्ये अद्यापि कोणतीच राजकीय चर्चा झालेली नाही. तसेच होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत कोणत्या पक्षांसोबत चर्चा करावी याबाबत पक्षांतर्गत कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे सध्या भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार, अशी राजकीय चर्चा सुरू असली तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मात्र, कोणत्या पक्षासोबत युती करावी याबाबत अंतिम निर्णय केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेच घेतील, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दक्षिण रत्नागिरी संपर्कप्रमुख मनीष पातरे स्पष्ट केली आहे.

हेही वाचा :Chandni Chowk Flyover Issue : चांदणी चौकातील उड्डाणपूल पुढील दोन तीन दिवसात जमीनदोस्त होणार - नितीन गडकरी

ABOUT THE AUTHOR

...view details