मुंबई - राज कुंद्रा पोर्नोग्राफी केसमध्ये मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने आणखी चार आरोपींना अटक केली आहे. वर्सोवा येथून एका आरोपीला तर बोरिवली परिसरातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक कास्टिंग डायरेक्टर आहे. आणि बाकीचे 3 त्याचे सहकारी आहेत.
काय आहे नेमके प्रकरण -
राज कुंद्रा हा पोर्नोग्राफी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जात आहे. राज कुंद्राची व्हिआन नावाची कंपनी असून तिचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायअप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या भावोजींच्या मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. (Raj Kundra Pornography Case Mumbai Crime Branch) या कंपनीच्या सर्व कन्टेन्टची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या व्हिआन या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हॉट्सअप ग्रुप, ई-मेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने पोर्नोग्राफी तयार करण्याच्या गुन्ह्यात राज कुंद्रासह 11 आरोपींना अटक केली आहे.
अशी झाली होती अटक
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी सोमवारी राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले होते. त्याच रात्री उशिरा राज कुंद्रा याला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या 10 तासानंतर नेरुळ परिसरातून रायन थोरपे याला या प्रकरणात अटक करण्यात आली. या दोघांना कोर्टाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आत्तापर्यंत राज कुंद्रासह 11 जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.