मुंबई -पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी अटकेत असलेला शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा याच्या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. आज (मंगळवार) राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपणार आहे, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल.
शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) उघडलेल्या या खात्यात वर्षात कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots App आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा-राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.तपासात याचीही माहिती मिळाली आहे, की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर वेगवेगळ्या मार्गाने छोट्या-छोट्या रक्कमेने पैसे ट्रान्स्फर केले आहेत. याला टेक्निकली भाषेत प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. दरम्यान, 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा तिची या विषयीही चौकशी केली गेली.