मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर गंभीर आरोप केला आहे. राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली, असा आरोप शर्लिनने केला आहे. तसेच, धमकीनंतर आता कुंद्रा आणि शिल्पाकडून तिला मानहानीची नोटीस देखील आल्याची माहिती तिने एएनआयला सांगितली आहे.
हेही वाचा -समीर वानखेडे कायदेशीर हिंदूच; निकाहनाम्याच्या त्या पेपर्ससोबत त्यांचा काहीही संबंध नाही - क्रांती रेडकर
मी पोलिसांना विनंती करते की, त्यांनी माझे म्हणणे नोंदवून घ्यावे जेणेकरून माझ्या तक्रारीची दखल घेतली जाऊ शकेल. आता मी उत्तरादाखल एक नोटीस पाठवली असून त्यात मानिसक छळ केल्याबद्दल 75 कोटींची मागणी केली, अशी माहिती शर्लिनने दिली आहे.
माहिती देताना अभिनेत्री शर्लिन चोप्रा
शर्लिनने १४ ऑक्टोबर रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधीही तिने मार्चमध्ये कुंद्रा आणि शिल्पाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती, जी नंतर मागे घेण्यात आली होती.
दुर्दैवाने, मानहानीच्या दाव्यांचा वापर न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्यासाठी शस्त्र म्हणून केला जातो, अशी प्रतिक्रिया शर्लिन चोप्राचे वकील सुहेल शरीफ यांनी दिली आहे.
हेही वाचा -पेगासस प्रकरणी नेमलेल्या समितीला न्यायालयाने अधिकार द्यावेत - गृहराज्यमंत्री