मुंबई - दक्षिण-पश्चिम मान्सून मुंबईत दाखल झाला आहे अशी माहिती मुंबई हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईत पाऊस दाखल झाल्याने गेल्या काही महिन्यात उन्हामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
इतक्या पावसाची नोंद -मुंबईत रात्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या २४ तासात पश्चिम उपनगरात सर्वाधिक तर सर्वात कमी पावसाची नोंद पूर्व उपनगरात झाली आहे. मुंबईत काल शुक्रवारी सकाळी ८ ते आज सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात शहर विभागात २५.५६, पूर्व उपनगरात २१.६४ तर पश्चिम उपनगरात ३४.१८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज शनिवारी सकाळी ७ ते ८ या एका तासात शहर विभागात कुलाबा फायर स्टेशन येथे २५, कुलाबा पंपिंग स्टेशन येथे २२, नरिमन पॉइंट फायर स्टेशन येथे १८.०४ तर पश्चिम उपनगरात दिंडोशी फायर स्टेशन येथे २.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे. गेल्या २४ तासात पश्चिम उपनगरात सर्वाधिक तर सर्वात कमी पावसाची नोंद पूर्व उपनगरात झाली आहे. मुंबईत वाहतूक सुरळीत सुरू आहे.
वाहतूक सुरळीत -पावसाची रिपरिप सुरू असल्याने कोणत्याही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना नोंद झालेल्या नाहीत. बेस्ट आणि रेल्वे सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
ठाण्यात वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. माजीवाडा परिसरात ही घटना घडली.
साताऱ्यातही पाऊस - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगर येथे 8 मि. मी., नवजा येथे 17 मि. मी. तर महाबळेश्वर येथे 9 मि. मी. पावसाची ( Mahabaleshwar Rainfall ) नोंद झाली आहे. सध्या धरणात 17.64 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक असून धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.
पावसाच्या आगमनाने पर्यटकांना दिलासा -कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये ( Mahabaleshwar Rainfall ) पावसाचे आगमन झाले आहे. शुक्रवारपासून पावसाची रिमझिम सुरू ( drizzle rain continues ) झाल्याने पर्यटक सुखावले आहेत. विकेंडला कोयना, महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी ( tourists Crowd in Mahabaleshwar) होते. या पर्यटकांना आता पावसाचा आनंद घेता येऊ लागला आहे. कोयनानगर येथे 8 मि. मी. नवजा येथे 17 मि. मी. तर महाबळेश्वरमध्ये 9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.