मुंबई -आतापर्यंत राज्यात 346 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 113 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती त्या तुलनेत यंदा अधिक पावसाची नोंद झाली आहे, तर गेल्या 24 तासांत राज्यात सरासरी 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये गडचिरोली नागपूर पालघर आणि कोकणात सर्वाधिक पाऊस होते आहे. ( Maharashtra receives heavy rainfall ) मुंबई परिसरातही गेल्या 24 तासांत जोरदार पाऊस पडला आहे. सांताक्रुज येथे 44 मिलिमीटर पावसाची तर, कुलाबा येथे 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
एकजणाचा मृत्यू झाला - पालघर जिल्ह्यात सर्वाधिक 74 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तीन नद्यां अद्यापही इशारा पातळीपेक्षा कमी वाहत आहेत. पालघरमध्ये वाघरा-पाडा येथे दरड कोसळल्याने एक घर डिघाऱ्याखाली गेले. यामध्ये चारजण ढिकाऱ्याखाली दबले होते. त्यापैकी एकजणाचा मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर, एका व्यक्तीचा शोध सुरू आहे.
परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला - रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ही पावसाचा जोर वाढला असून रायगड मध्ये ७२ मिलिमीटर तर रत्नागिरी ५८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, दरड प्रवण व पूरप्रवण भागातील 986 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.