मुंबई -पहिल्या पावसातच मुंबईकरांची पुरती तारांबळ उडाली होती. पण मागील दोन दिवसांपासून मुंबईला पावसाने विश्रांती दिली होती. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. पण आज (बुधवार) पुन्हा मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
रत्नागिरीला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट -
मंगळवार रात्री पासूनच मुंबईत आणि मुंबई उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरूवात झाली असल्यामुळे मुंबईमधील अनेक सखल भागात पावसाचे पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दादर हिंदमाता, सायन, माटुंगा या भागात पाणी साचण्यास सुरवात झाली आहे. बुधवारी दिवसभर मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर कोकणातही आज (बुधवार) संपूर्ण दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस असणार आहे. रत्नागिरीला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.