महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पूर्व उपनगरात पावसाची विश्रांती; घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी - Mumbai suburbs

सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसाने शहर व उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते.आज(सोमवारी) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकानर प्रवाशांची गर्दी होत आहे.

मुंबई

By

Published : Aug 5, 2019, 1:51 PM IST

मुंबई- सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसाने शहर व उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. मध्य व हार्बर मार्गावर धावणारी मुंबईकरांची जीवनवाहिनी रविवारी सकाळपासून सायंकाळ पर्यंत ठप्प होता. आज(सोमवारी) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकानर प्रवाशांची गर्दी होत आहे.

मुंबई पूर्व उपनगरात पावसाची विश्रांती

सोमवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणात कामावर निघताना दिसत आहेत. यातच लोकल रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात चारही फलाटावर गर्दी झाली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान डब्याजवल थांबून गर्दी कमी करत आहेत. काही प्रवासी धोकादायकपणे रेल्वे रुळावरून लोकलमध्ये चढत आहेत.

मुंबई शहर व उपनगरात रविवारी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी शहर व उपनगरातील शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थी घरीच थांबले आहेत. मात्र, पाऊस थांबला असल्याने हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा सध्या तरी फोल ठरला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details