महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पावसाची क्षणभर विश्रांती! हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई मध्ये जोरदार पाऊस सुरू होता. परंतु आज पावसाने क्षणभर विश्रांती घेतली आहे. तसेच हवामान विभागाने मुंबई, कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

By

Published : Jun 13, 2021, 1:09 PM IST

मुंबई- मागच्या तीन ते चार दिवसांपासून मुंबई मध्ये जोरदार पाऊस सुरू होता. मुंबईत पावसाची धमाकेदार एंट्री झाली आहे. मुंबईच्या अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे चित्र देखील दिसून आले. अशातच हवामान विभागाने मुंबई, कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

मुंबई आणि उपनगरांत आणखी काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशातच आज मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला होता. मात्र, तो आता ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला आहे. आज सकाळपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. ऊन आणि ढगांमुळे होणारी सावली यांचा लपंडाव सुरू आहे. मुंबईत ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे पाऊस होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा -अन् शिवसेना आमदाराने कंत्राटदारालाच बसवलं नाल्यात; कचऱ्याने घातली अंघोळ

ABOUT THE AUTHOR

...view details