महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत पावसाने घेतला ब्रेक; जनजीवन पूर्वपदावर, सुट्टीमुळे वर्दळ कमी - rain

मुंबईत मागील दोन दिवसांपासुन सुरु असलेला मुसळधार पाऊस सोमवारी सकाळी थांबला आहे. पावसानंतर कुठेही पाणी साचल्याची माहीती नाही. तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने रस्त्यावर नागरिकांची वळदळ कमी असल्याचे पाहण्यात येत आहे.

मुंबईतील रस्त्यावर नागरिकांची वळदळ कमी

By

Published : Aug 5, 2019, 10:23 AM IST

मुंबई -शहर आणि उपनगरात मागील ४८ तासात जोरदार पाऊस सुरू होता. मात्र रविवारी रात्रीनंतर पावसाचा जोर कमी झाला असुन सोमवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली. यामुळे मुंबानगरीतील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

मुंबईत पावसाने घेतला ब्रेक
मुंबईत मागील दोन दिवसात मुसळधार पाऊस झाला. तसेच रविवारी हवामान विभागाने येत्या ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. यामुळे सुरक्षिततेची काळजी घेत शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र रविवारी रात्रीनंतर पाऊस ओसरला असुन सकाळी पाऊस पुर्णपणे थांबला आहे. पावसानंतर कुठेही पाणी साचल्याची माहिती नाही. तर शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने रस्त्यावर नागरिकांची वळदळ कमी असल्याचे पाहण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details