मुंबई -मागील काही दिवसांपासून उपनगरीय मध्य रेल्वेवर धावत असणाऱ्या AC ट्रेनवरून प्रवासी संतापले आहेत. सामान्य ट्रेन बंद करून AC ट्रेन वाढवल्याने प्रवाशांमध्ये मोठा संताप दिसून येत आहे. NCP MLA Jitendra Awhad urges Central Railway याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एका नॉन ऐसी ट्रेन मधून ३ ते ४ हजार प्रवासी जातात. तर एका AC ट्रेन मधून केवळ ७०० ते १००० प्रवासी जातात. रेल्वे प्रशासनाने साध्या लोकल बंद करून ऐसी लोकल चालवण्याची गरज काय, असा प्रश्न ही आव्हाड यांनी विचारला आहे. दररोज इतके प्रवासी मरत आहेत त्यांचा रेल्वे ने विचार करावा. AC ट्रेन ची गरज, मागणी नसताना रेल्वे प्रशासन का जबरजस्ती करत आहे, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
Close AC Trains रेल्वेने प्रवाशांना नको असलेल्या AC लोकल त्वरित बंद कराव्यात -जितेंद्र आव्हाड - AC ट्रेन बंद करण्याची आव्हाडांची माग
रेल्वे प्रशासनाने मागे मध्य व पश्चिम रेल्वेवर ऐसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला. त्याला प्रवाशाकडून समिश्र प्रतिसाद मिळत आहे. परंतु आता काही नियमित धावणाऱ्या साध्या लोकल ट्रेन रद्द करून त्या AC केल्याने प्रवाशी संतापले आहेत. याबाबत मध्य रेल्वेवर प्रवाशांनी आंदोलन ही केले. AC locals with AC trains प्रवाशांच्या या प्रश्नाबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रवाशांना नको असलेली AC लोकल बंद करण्याची मागणी केली. परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता त्यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाला पुन्हा एकदा याबाबत सकारात्मक विचार करण्याची विनंती केली आहे. तसे झाले नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
![Close AC Trains रेल्वेने प्रवाशांना नको असलेल्या AC लोकल त्वरित बंद कराव्यात -जितेंद्र आव्हाड रेल्वेने प्रवाशांना नको असलेल्या ऐसी लोकल त्वरित बंद कराव्यात -जितेंद्र आव्हाड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16185129-thumbnail-3x2-railwaac.jpg)
आम्ही अजून शांत आहोतपुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पश्चिम व मध्य मुंबई उपनगरीय रेल्वेचे उत्पन्न हे सर्वात जास्त आहे. लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात जर ही लाखो लोक उद्या रस्त्यावर ट्रॅक वर उतरली तर रेल्वे प्रशासन हतबल होऊन जाईल. इतक्या आंदोलन प्रवाशांना तुम्ही रोखणार कसे, मला आज हजारो प्रवाशांचे फोन येत आहेत. मी सातत्याने त्यांच्याशी बोलत आहे. जर का हे आंदोलन भडकवायचे असते तर त्याला जास्त वेळ लागणार नाही. पण आम्ही तसे करू इच्छित नाही, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला एक प्रकारे धमकी वजा इशारा दिला आहे. तसेच, रेल्वेचे रात्रीचे भोंग्याचे डेसीबल हे १७५ च्या वर असते, त्यांना नियम वेगळा आहे का, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -Maharashtra Monsoon Session विधानसभा परिसरात धक्काबुकी, मातोश्रीवर खोके पोचल्याच्या आरोपावरुन गदारोळ