मुंबई -एसी लोकलला प्रचंड ऊर्जा लागते ( Mumbai AC Local ) म्हणजेच महाप्रचंड विद्युत पुरवठा लागतो. कारण इतर लोकलच्या तुलनेने संपूर्ण लोकल ट्रेन वातानुकूलित करण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रणा अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे अधिकचा वीजपुरवठा लागणार ही बाब तर्कसंगतच . मात्र यामुळे प्रचंड विद्युत पुरवठा वापर एसी लोकलसाठी होतो. यातून विजेची बचत ( Saving electricity ) करायची असेल तर नामी शक्कल रेल्वेच्या अभियंत्यांनी लढवली आहे. त्यांनी सौर उर्जेवर चालणारा एक डबा तयार केलेला आहे ; जाणून घेऊया सविस्तरपणे
Mumbai AC Local : मुंबईत धावणार सौर उर्जेवर रेल्वे - जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर
मुंबईत पुढील काही दिवसातच सौर ऊर्जेचे दिवे, पंखे असलेला लोकल एसी डबा ( Mumbai AC Local ) सर्वप्रथम पश्चिम रेल्वे ( Western Railway ) मार्गावर धावणार आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे ( Western Railway ) जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर ( Public Relations Officer Sumit Thakur ) यांनी दिली आहे.
कशी असेल लोकल - सौर उर्जेवर डबा चालणार कसा? याबाबत पश्चिम रेल्वेचे ( Western Railway ) जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर ( Public Relations Officer Sumit Thakur ) यांनी सविस्तर माहिती विशद केली आहे. "मुंबईत पुढील काही दिवसातच सौर ऊर्जेचे दिवे, पंखे असलेला डबा सर्वप्रथम लोकल ट्रेनमध्ये असणार आहे .ही लोकल ट्रेन पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार आहे . या पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमध्ये एक डबा सर्वप्रथम चालवला जाईल. त्याची पाहणी ,पडताळणी, परीक्षण निरीक्षण केले जाईल. त्यानंतर हळूहळू सर्व डबे सौरऊर्जेवर चालवण्याचा प्रयत्न पश्चिम रेल्वे द्वारे करण्यात येणार आहे. या सौर उर्जेवर चालणाऱ्या डब्यामध्ये खास सोय म्हणजे सौर उर्जेवर संपूर्ण दिवे पंखे इतर यंत्रणा चालवल्या जातील. तसेच या डब्यात अनोखी सोय असणार आहे. प्रवाशांना एखादी घटना घडली. त्याच लोकलच्या ड्रायव्हर किंवा गार्डला त्वरित कळवायची आहे. त्यासाठी खास गाडीमध्ये बसवलेला वॉकी टॉकी वापरता येणार आहे."
एसी लोकलमध्ये सौर ऊर्जेचे पॅनल -यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांना विचारले असता त्यांनी खुलासा केला की पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर आपण एक लोकल अशी सुरू करत आहोत . या एसी लोकलमध्ये सौर ऊर्जेचे पॅनल बसवलेले आहेत. ते वजनाने हलके असतात. त्यामधून तीन 3.6 किलो वॅट वीज निर्माण होते. ट्रेनच्या एकाच डब्यात हा प्रयोग केला जाणार आहे . पुढील आठवड्यात याची प्रायोगिक चाचणी केली जाईल. चाचणीनंतर त्याबद्दल सर्व डब्यांसाठी तशी व्यवस्था करायची की नाही याच्यावर ते अवलंबून असेल.