मुंबई -मध्य रेल्वेच्या मार्गावर लाखो प्रवासी रोज कामानिमित्त ये जा करतात. उद्योग व्यवसाय सर्व क्षेत्रामधील प्रवासी मध्य रेल्वेचा वापर करतात प्रचंड गर्दी असल्यामुळे अनेक फुकटे प्रवासी गरजू प्रवासी विना तिकीट रेल्वेने प्रवास करतात. या फुकट्या प्रवाशांच्या विरोधात (without ticket passengers) मध्य रेल्वेने मोहीम राबवली होती. मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत १४३.३७ कोटी रुपयांचा विक्रमी तिकीट तपासणी महसूल जमा केला (Railways collected more than Rs 143 crore fine).
फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने 143 कोटी रुपयापेक्षा अधिक दंड वसूल यावर्षी सुमारे 115 टक्के वाढ - ऑगस्ट-२०२२ या महिन्यात, मध्य रेल्वेने बुक न केलेल्या सामानासह तिकीटविरहित, अनियमित प्रवासाच्या २.९२ लाख प्रकरणांमधून रु. १७.१६ कोटींचा महसूल नोंदवला आहे. एप्रिल-ऑगस्ट २०२२ या कालावधीत, विनातिकीट, अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या सामानाची एकूण २१.१९ लाख प्रकरणे आढळून आली आहेत. तर मागील वर्षी याच कालावधीत ९.९४ लाख प्रकरणे आढळून आली होती. ज्यामध्ये ११४.२१ टक्केची वाढ झाली आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती - अशा विनातिकीट, अनियमित प्रवासातून मिळालेला महसूल एप्रिल-ऑगस्ट २०२२ या कालावधीत ₹ १४३.३७ कोटी नोंदविला गेला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीतील रु. ५७.८० कोटींच्या महसूलाच्या तुलनेत १४८.०२ टक्केची वाढ दर्शवित आहे. अशी माहिती मध्यरेल्वे जनसंपर्क अधिकारी के. के. सिंग यांनी दिली.
पूर्वीच्या मोहिमेतील वसुली - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून 2020 ते मार्च 2021 पर्यंत उपनगरी लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये नियमित आणि सखोल तिकीट तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान 3 लाख 43 हजार फुकट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांंच्याकडून 12 कोटी 29 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी सुमारे 2 कोटी 48 लाख प्रकरणे हे उपनगरी भागात आढळून आले आहेत. त्यांच्याकडून 6 कोटी 63 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये एकू 95 हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून 5 कोटी 62 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर मागील एक महिन्यामध्ये एकूण 75 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकूडन एकूण 3 कोटी 97 लाख रुपये वसूल करण्यात आले.
हेही वाचा - पालघराचा जीवघेणा ब्लाइंड स्पॉट, सायरस मिस्त्रींसह इथे अपघातामुळे अनेकांचा मृत्यू