महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 24, 2020, 4:18 PM IST

ETV Bharat / city

कृषी विधेयक केंद्रात मंजूर झाल्याने तीन दिवस पंजाब बंदची हाक, रेल्वे रद्द आणि मार्ग बदलले

केंद्रात कृषी विधेयकाविरोधात मंजुरी मिळाल्याने पंजाब हरियाणा शेतकऱ्यांनी तीन दिवसांसाठी 'पंजाब बंद'ची हाक दिलेली आहे. 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर अशा तीन दिवसांसाठी पंजाब बंदची हाक स्थानिक राजकीय पक्षांनी, शेतकऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे पंजाबहून आणि इतर देशातील शहरांमधून पंजाबमध्ये प्रवास करणार असेल, त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.

तीन दिवस पंजाब बंद
तीन दिवस पंजाब बंद

मुंबई -केंद्रात कृषी विधेयकाविरोधात मंजुरी मिळाल्याने पंजाब हरियाणा शेतकऱ्यांनी तीन दिवसांसाठी 'पंजाब बंद'ची हाक दिलेली आहे. कृषी विधेयकामुळे देशभरातील शेतकरी नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये या विधेयकाला विरोध करण्यासाठी पंजाब बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणतीही अपरिचित घटना घडू नये, म्हणून पंजाबमधून सुटणाऱ्या आणि पंजाबमध्ये जाणाऱ्या सर्व रेल्वे रद्द व प्रवासाचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत, अशी माहिती उत्तर भारतीय रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे.

तीन दिवस पंजाब बंद, रेल्वे रद्द व मार्ग बदलले
24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर अशा तीन दिवसांसाठी पंजाब बंदची हाक स्थानिक राजकीय पक्षांनी तसेच शेतकऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे पंजाबहून आणि इतर देशातील शहरांमधून पंजाबमध्ये प्रवास करणार असेल, त्यांनी याबाबत माहिती घेऊन प्रवास करावा, असे आवाहन उत्तर भारतीय रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. उत्तर रेल्वे विभागाने पुढील माहिती दिलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details