मुंबई - उपनगरीय रेल्वेतून फिरणाऱ्या विनातिकीट प्रवाशांसाठी, रेल्वेचा एक अहवाल चांगलाच धडकी भरवणारा आहे. याचे कारण रेल्वेतर्फे सर्वात जास्त दंड वसूल करणाऱ्या चार तिकीट तपासनीसांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात फुकट्या प्रवाशांचा कर्दनकाळ म्हणून नावाजलेले रवी कुमार यांचेही नाव आहे. तेव्हा विनातिकीट रल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आता वेळीच सावध व्हावे आणि तिकीट काढून प्रवास करावा.. अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल.
विनातिकीट रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धोक्याची सुचना... असे केल्यास तुमच्याकडून दंड वसूल होणारच.. हेही वाचा... ...म्हणून मनसेने झेंडा बदलला, राज ठाकरेंचा खुलासा
रवी कुमार हे फुकट्या प्रवाशांचा कर्दनकाळ म्हणून प्रसिद्ध आहेत. तिकीट तपासनीस रवी कुमार यांनी 2019 या वर्षात 1 कोटी 45 लाखांचा दंड फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला. रेल्वेतर्फे सर्वात जास्त दंड वसूल करणाऱ्या तिकीट तपासनीस यांची नावे जाहीर करण्यात आली. त्या चार तिकीट तपासनीसांनी 2019 मध्ये 1 कोटींच्यावर दंड वसूल केला आहे.
हेही वाचा... 'मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा हा शिवप्रेमींचा अवमान'
मुंबईत मध्य रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र असे काही प्रवासी आहेत, जे विनातिकीट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांना पकडण्याचे काम तिकीट तपासनीस करतात. यामध्ये एस. गलांडे यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्यांनी 1 कोटी 51 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यानंतर रवी कुमार यांनी 1 कोटी 45 लाख , एम एम शिंदे 1 कोटी 7 लाख, डी कुमार 1 कोटी 2 लाख असा दंड वसूल केला आहे. रवी कुमार यांनी आतापर्यत 20, 657 फुकट्या प्रवाशांना पकडले आहे.
हेही वाचा... 'मनसेने झेंड्यावर राजमुद्रा वापरल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार'
तिकीट तपासनीस रवी कुमार यांच्यासोबत बातचीत केली असता, त्यांनी आपल्या कामगिरीचे श्रेय वरिष्ठांना आणि त्यांच्या पत्नीला दिले आहे.