महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे सुरक्षा दल ठरते रेल्वे प्रवाशांचे तारणहार; ५ महिन्यांत ३१ जणांना मिळाले जीवनदान - Railway security forces save 31 lives

मध्य रेल्वेचा सुरक्षा दलाचे जवान केवळ रेल्वेच्या मालमत्तेचेच रक्षण करण्यासाठीच नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात आणि चोवीस तास जागरुक असतात.

Railway security force
फाईल फोटो

By

Published : Jun 10, 2022, 8:57 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे जवान रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात. मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" चा एक भाग म्हणून जानेवारी ते मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवर स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ३१ जणांचे प्राण वाचवले आहेत.

३१ प्रवाशांचे वाचवले प्राण - मध्य रेल्वेचा सुरक्षा दलाचे जवान केवळ रेल्वेच्या मालमत्तेचेच रक्षण करण्यासाठीच नव्हे तर कर्तव्यावर असलेल्या इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठीही नेहमीच आघाडीवर असतात आणि चोवीस तास जागरुक असतात.मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी "मिशन जीवन रक्षक" चा एक भाग म्हणून जानेवारी ते मे २०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवर काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालूनही आतापर्यंत ३१ जणांचे प्राण वाचवले आहेत. या जीव वाचवणाऱ्या घटनांचे काही व्हिज्युअल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या ३१ घटनांपैकी एकट्या मुंबई विभागात १६ जीव वाचवणाऱ्या घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ आणि नागपूर विभागात प्रत्येकी ६ जीवरक्षक घटना, पुणे विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनेची आणि सोलापूर विभागात एक जीव वाचवण्याच्या घटनेची नोंद झाली आहे. २०२१ या वर्षात मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ५२ प्रवाशांचे प्राण वाचवले त्यापैकी ३५ जीव वाचवण्याची प्रकरणे फक्त मुंबई विभागात नोंदवली गेली.

सुरक्षा आव्हानांचा सामना - रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि ट्रेन तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. ते प्रवाशांच्या सुरक्षिततेवर बारीक लक्ष ठेवतात. बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क आरपीएफने अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचला आहे. पण सरतेशेवटी, जीवरक्षकांच्या या कृतीचा परिणाम आनंद, जल्लोष आणि आरपीएफ जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

ABOUT THE AUTHOR

...view details