मुंबई भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयअंतर्गत रेल्वे भरती मंडळाने ग्रुप डी गटासाठी Examination For Group D परीक्षेकरिता RRB Under Ministry of Railways केवळ दहा दिवसांचा अवधी असतानाच माहिती प्रसिद्ध केली. त्यामुळे देशभरातून रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षेसाठी बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेला कसे पोहचणार, ट्रेनचे तिकीट कसे मिळणारStudents Facing Worry to How Get Train Ticket, याची चिंता Students Facing Worry of Reaching Exam on time भेडसावत आहे. कारण देशाच्या विविध राज्यांतून उमेदवार या परीक्षेला बसलेले आहेत.
विद्यार्थ्यांना रेल्वे तिकिटाची चिंता मध्य प्रदेशच्या बिलासपूर झोनच्या 25000 पेक्षा अधिक उमेदवारांना परीक्षेसाठीचे केंद्र तेलंगणा या ठिकाणी देण्यात आले. तसेच, झारखंड या ठिकाणी पण देण्यात आले आहे. आणि याची माहिती केवळ दहा दिवस अगोदर उमेदवार विद्यार्थ्यांना दिली गेली आहे. त्याच्यामुळे परीक्षेला आणि एवढ्या कालावधीत रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण कसे मिळणार. देशातील अनेक राज्यांतून विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. एवढ्या कमी कालावधीत आरक्षित रेल्वे तिकीट मिळणे अवघड आहे.
रेल्वे या वेळेत सोडण्याचे नियोजन रेल्वे मंडळाकडे महाराष्ट्रातूनसुद्धा तसेच मूळचे बिहार आणि उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. अशा उमेदवारांनादेखील परीक्षेला जायचे तर तिकीट कसे मिळेल ही समस्या आहे. याबाबत मध्य रेल्वे अधिकारी ए. के. सिंग यांच्यासोबत बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, रेल्वे भरती मंडळ अंतर्गत ही प्रक्रिया होते. कोणत्या रेल्वे गाड्या किती आणि केव्हा सोडायच्या याचा निर्णय रेल्वे मंडळ करते. त्यामुळे याबाबत आमच्या स्तरावर आम्ही काही सांगू शकत नाही. तर रेल्वे भरती मंडळ मुंबई कार्यलयात संपर्क केला असता सहायक सचिव व्यस्त असल्याचे सांगण्यात आले असल्याने मंडळाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.