महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

व्हिडिओ : मुंबईत 59 वर्षीय आजोबांचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

वाराणसी-मुंबई महानगरी विशेष गाडी आपल्या ठरलेल्या वेळेनंतर त्याच्या गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. यादरम्यान गाडीचा वेग वाढत असताना एक वृद्ध प्रवासी धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ट्रेनच्या दरवाज्यामधून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना त्या वृद्ध प्रवाशांचा पाय घसरला.

मुंबई
मुंबई

By

Published : Jun 24, 2021, 9:15 PM IST

Updated : Jun 24, 2021, 9:59 PM IST

मुंबई -धावत्या ट्रेनमधून उतरत असताना वृद्ध प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या प्रवाशाला रेल्वे पोलिसांनी वाचवले. ही घटना दादर रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आरपीएफ कॉंन्स्टेबल उमेश माली यांनी प्रवाशांच्या मदतीने वेळीच मदत केल्याने वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचले आहे.

मुंबईत 59 वर्षीय आजोबांचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

अशी घडली घटना-

मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजून ८ मिनिटांच्या सुमारास ट्रेन क्रमांक ०२१९४ वाराणसी-मुंबई महानगरी विशेष गाडी दादर स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर आली होती. वाराणसी-मुंबई महानगरी विशेष गाडी आपल्या ठरलेल्या वेळेनंतर त्याच्या गंतव्य स्थानकाकडे रवाना होत होती. यादरम्यान गाडीचा वेग वाढत असताना एक वृद्ध प्रवासी धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ट्रेनच्या दरवाज्यामधून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना त्या वृद्ध प्रवाशांचा पाय घसरला. रेल्वे प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधल्या पोकळीत पडत असताना कर्तव्यांवर असलेल्या आरपीएफ काँन्स्टेबल उमेश माली यांनी समयसूचकता दाखवून एका सह प्रवाशांच्या मदतीने त्या प्रवाशाला ट्रेन जवळून खेचून वाचविले आहे.

सीसीटीव्ही कॅमेरात घटना कैद-

ही संपूर्ण घटना दादर रेल्वे स्थानकांवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच आरपीएफ कॉन्स्टेबल उमेश माली यांनी प्रसंगावधान दाखवत या वृद्ध प्रवाशांचे प्राण वाचवले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

आजोबांनी मानले आभार-

रेल्वे पोलिसांनी वृद्ध प्रवाशाला विचारपूस केली असता विजय कुमार पटेल असे त्यांनी आपले नाव सांगितले. आजोबा उल्हासनगरचे रहिवासी असून वाराणसीवरून मुंबईला येत होते. यादरम्यान ही घटना दादर स्थानकांवर घडली. मात्र, सुदैवाने आरपीएफ काँन्स्टेबल उमेश माली यांच्या प्रसंगावधान त्यांचे प्राण वाचले आहे.आजोबांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहे.

महाव्यवस्थापकांकडून कौतुकाची थाप-

आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्या घालून आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचले आहेत. आरपीएफ कॉन्स्टेबल उमेश माली यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका वृद्ध प्रवाशाच्या जीव वाचला आहे. त्यामुळे त्यांना 2 हजार रुपयांचे बक्षीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कँसल यांनी दिले आहे.

हेही वाचा -NaviMumbaiAirport : 'नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न 15 ऑगस्टपर्यंत निकाली काढावा; अन्यथा तीव्र आंदोलन करू'

Last Updated : Jun 24, 2021, 9:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details