मुंबई-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) दादरच्या चैत्यभुमीवर (Dadar Chaityabhumi) दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता रेल्वे पाेलिस (Railway Police) सज्ज झाले आहेत. पाच आणि सहा डिसेंबर राेजी दादर स्थानक आणि परिसरात हाेणारी गर्दी पाहता दादर स्थानकातील पुर्व- पश्चिम जाेडणारा माेठा पुल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय अनुयायांचा सोयीसाठी ८ विशेष लोकल चालविण्यात येणार आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे पाेलिस सज्ज, अनुयायांचा सोयीसाठी धावणार ८ विशेष लोकल
६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) मुंबईत (Mumbai) सुमारे ३ ते ४ लाख अनुयायी येतील, असा अंदाज रेल्वे पाेलिसांनी (Railway Police) व्यक्त केला आहे. त्यानिमित्त रेल्वे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. दादरच्या चैत्यभूमीवर नतमस्तक होण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी ८ विशेष लोकल रेल्वे (Special Local Railways) धावणार आहेत.
गर्दी होऊ नये, म्हणून खबरदारीची पावले
सध्या उपनगरीय रेल्वेची (suburban railway) वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याने प्रवाशांची संख्या ७२ लाखांपर्यत पाेहाेचली आहे. त्यात दरराेज १० ते १५ हजार नविन पासधारकांची संख्या वाढत आहे. ६ डिसेंबरनिमित्त मुंबईत सुमारे ३ ते ४ लाख अनुयायी येतील, असा अंदाज लाेहमार्ग पाेलिसांनी व्यक्त केला आहे. परिणामी दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकतील पूर्व- पश्चिम जाेडणारा माेठा ब्रीज व प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरील सर्व प्रवेशद्वार शहर हद्दीतून रेल्वे स्थानकात येणाऱ्या अनुयायी व प्रवाशांकरिता बंद राहिल. या पुलावरुन दादर स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांना पूर्व- पश्चिम दिशेला शहर हद्दीत बाहेर जाण्यासाठी तसेच दादर मध्य व पश्चिम रेल्वे स्थानकातील एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी खुला राहिल.
'असा' असणार बदल
दादर स्थानकातील मध्यभागी असलेल्या पादचारी पुलाच्या बाजूस मध्य रेल्वेचा छोटा पादचारी पूल आहे. या पुलाचा वापर लोकल, मेल, एक्स्प्रेससह रस्तेमार्गाने येणाऱ्या अनुयायी आणि प्रवाशांसाठी खुला असेल. स्काॅयवाॅकलगत पश्चिम रेल्वेचा पादचारी पूल आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म २, ३, ४, ५ वर उतरणाऱ्या प्रवाशांना दक्षिणेकडील पुलावरुन पूर्व व पश्चिम दिशेला जाता येईल. तसेच मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म ३, ४, ५ व ६ वर प्रवेश करता येईल. प्लॅटफॉर्म एकवरुन लिफ्ट या काळात बंद राहिल, अशी माहिती लाेहमार्ग पाेलिसांनी दिली.
८ विशेष लोकल धावणार
महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार- रविवारच्या मध्यरात्री, सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल (CSMT to Panvel) दरम्यान अप आणि डाऊन विशेष आठ फेऱ्या धावणार आहेत. कल्याण ते सीएसएमटी विशेष लोकल ही कल्याण येथून रात्री 1 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री 2.30 वाजता पोहोचेल. कल्याण- सीएसएमटी (Kalyan to CSMT) विशेष लोकल ही कल्याण येथून रात्री 2.15 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटी येथे रात्री 3.45 वाजता पोहोचेल. सीएसएमटी ते कल्याण ही विशेष लोकल सीएसएमटी येथून रात्री 1.30 वाजता सुटेल. ही लोकल कल्याण येथे रात्री 3 वाजता पोहोचेल. याशिवाय रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार नाही आहे.