मुंबई - देशभरात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला ( Covid Cases Rises ) आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक केले ( Railway Ministry Advises Wear Mask ) आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने जारी करण्यात आलेल्या एसओपीचे पालन करण्याचे आदेश देशातील सर्व रेल्वे झोनल कार्यालयांना दिले आहे.
सर्व झोन कार्यालयांना पत्र - गेल्या २४ तासांत देशभरात ३ हजार २०७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेत. दुसरीकडे रेल्वेने खबरदारी म्हणून 22 मार्च रोजी कोविड संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या एसओपीचे पालन करण्याचे आदेश देशभरातील सर्व झोनच्या चीफ कमर्शियल मॅनेजर्सना दिले आहे. याबाबत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाने पत्र सुद्धा पाठवले आहे. याशिवाय रेल्वे बोर्डाने सर्व झोनल रेल्वे विभागांना सुचना दिल्या आहे की, सर्व रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरात प्रवाशांना मास्क वापरने बंधनकारक केले आहे. तसेच, रेल्वे कर्मचाऱ्यांनीही मास्कचा वापर करण्याचे निर्देश दिले आहे.