मुंबई-स्वतःचा जीव धोक्यात घालून मध्य रेल्वेचे सहाय्यक लोको पायलट सतीश कुमार यांनी नदीच्या पुलावर अडकून पडलेल्या गोदान एक्स्प्रेस ट्रेनची अलार्म चेन पुलिंग ( Railway Chain Pull ) रिसेट केल्याने रेल्वेची विस्कळीत झाली नाही. सतीश कुमार यांच्या धाडसी कार्यची दखल घेत रेल्वे मंत्र्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सतीश कुमार यांच्या अलार्म चेन पुलिंग रिसेट ( Railway Chain Pull Alarm Reset ) करण्याचा व्हिडीओ शेअर करत प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीतच ट्रेनची साखळी ओढण्याचे आव्हान केले ( Railway Minister praises Satish Kumar ) आहे.
स्वतःचा जीव धोक्यात घालून चेन पुलिंग केली रिसेट- गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गवरील रेल्वे प्रवास काही प्रवाशांकडून विनाकारण अलार्म चेन पुलिंग करण्याचा घटना वाढल्या आहेत. काही आपत्कालीन परिस्थितीत ट्रेन थांबवण्यासाठी प्रत्येक रेल्वे डब्यात अलार्म चेन असते, जे ओढल्यावर प्रवाशाही हवे तेव्हा ट्रेन थांबवू शकतात. मात्र, अनेकदा प्रवाशांकडून छोट्याश्या कारणासाठीही ही चेन पुलिंग करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे रेल्वेला मोठा फटका बसतो आहे. अशीच एक घटना काल घडली आहे. ट्रेन क्रमांक 11059 गोदान एक्स्प्रेसमधील अज्ञान प्रवाशांने अचानक अलार्म चेन पुलिंग केल्याने टिटवाळा व खडवली स्थानकांदरम्यान नदीच्या पुलावर गोदान एक्स्प्रेस थांबली होती. त्यामुळे मागून येणाऱ्या रेल्वे गाड्या काही वेळासाठी खोळंबणार होत्या. मात्र, सहाय्यक लोको पायलट, सतीश कुमार यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नदीच्या पुलावर थांबलेल्या गोदान एक्स्प्रेसची अलार्म चेन रीसेट केली. त्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली.