मुंबई - रेल्वे भरतीत 150 लोकोपायलटला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने न्याय दिला. त्याच पार्श्वभूमीवर सर्व लोकोपायलटनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले ( Railway Loco Pilot Meet Raj Thackeray ) आहेत. तर, उर्वरित पदे लवकर न भरल्याल रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन उभारणार असल्याचा इशारा रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिला.
जितेंद्र पाटील म्हणाले, "रेल्वे भरती बोर्डाने असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती जाहीर केली होती. भरती जाहीर करून सुद्धा रिक्त पदे भरण्यास रेल्वे प्रशासन हलगर्जीपणा करत होते. मात्र, मनसेच्या पाठपुराव्यामुळे रेल्वेने असिस्टंट लोको पायलटची दीडशे पदे भरली. १५० उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेने न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे या १५० नवनियुक्त असिस्टंट लोकोपायलट कर्मचाऱ्यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली आणि आभार मानले."