मुंबई - पावसाळ्यात रेल्वे घाट मार्गावर दरड कोसळण्याच्या वाढत्या घटना, जंगली श्वापदांचा वाढत वावर, थंडीत धुक्याचे सावट हे रेल्वे अपघातांना कारणीभूत ठरते. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वेकडून वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहे. अपघातादरम्यान घाटमाथ्यावरील नेटर्वकच्या समस्या उदभवू नयेत, अपघातांबाबद माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला पोहचावी यासाठी आता रेल्वेकडून नव्या टी-माइस्ट्रो अॅप आणण्यात आलं आहे. यावर ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट
Railway T maestro app : आपत्कालीन अपघातांसाठी रेल्वेचे टी-माइस्ट्रो अॅप - इगतपुरी ते कल्याण
अपघातादरम्यान घाटमाथ्यावरील नेटर्वकच्या समस्या उदभवू नयेत, अपघातांबाबद माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला पोहचावी यासाठी आता रेल्वेकडून नव्या टी-माइस्ट्रो ( Railway T maestro app ) अॅप आणण्यात आलं आहे. यावर ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट
घाटमाथ्यानावरील रेल्वे मार्गाची सुरक्षा वाढणार
रेल्वेचा प्रवास सुखर व्हावा, यासाठी रेल्वेकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. घाटमाथ्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वेने आणलेला नवा टी-माइस्ट्रो अँप तयार केला आहेत. या अँपमुळे घाटमाथ्यानावरील अपघातांची मालिका कमी कारण्यासाठी उपयोग ठरणार आहे. आपत्कालीन सॉकेट तत्वरित कार्यन्वित व्हावे यासाठी हा नवा टी-माइस्ट्रो अँप महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. मध्य रेल्वेच्या विभागात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होतात. त्यातच तिथे नेटवर्कची समस्या असल्याने रेल्वेच्या लोको पायलट व गार्ड यांना संभाषण साधताना अनेक अडथळा निर्माण होतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांना आणि रेल्वेचा नियंत्रण कक्षाला यांची माहिती मिळावी आणि तात्काळ तिथे मदत पोहचविण्यासाठी कल्याण ते कसारा आणि इगतपुरी ते कल्याण दरम्यान रेल्वे मार्गावर २५० पेक्षा जास्त आपत्कालीन सॉकेट बसविण्यात आले आहे. या सॉकेटच्या नियमितपणे दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने अत्याधुनिक अँप तयार केले आहे.
हेही वाचा -Special Story : किसान रेल्वेमुळे डहाणू - घोलवड चिकू व्यापार गतिमान; गतवर्षी 35 हजार टन चिकूची वाहतूक
काय आहे आपत्कालीन सॉकेट ?