महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वे गार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्रवाशाला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - मुंबई न्यूज अपडेट

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवर धावत्या रेल्वेत चढताना एका प्रवाशाचा तोल गेला. तोल जाऊन हा प्रवाशी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडला. मात्र कर्तव्यावर असलेल्या रेल्वे जवान आणि रेल्वे गार्डने स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचा जीव वाचवला आहे. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

रेल्वे गार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्रवाशाला
रेल्वे गार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्रवाशाला

By

Published : Jun 12, 2021, 8:39 PM IST

Updated : Jun 12, 2021, 10:18 PM IST

मुंबई -मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवर धावत्या रेल्वेत चढताना एका प्रवाशाचा तोल गेला. तोल जाऊन हा प्रवाशी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडला. मात्र कर्तव्यावर असलेल्या रेल्वे जवान आणि रेल्वे गार्डने स्वतःचा जीव धोक्यात घालून, प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचा जीव वाचवला आहे. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

'अशी' घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवरून ट्रेन क्रमांक 01133 मुंबई-मंगळुरू विशेष एक्स्प्रेस रवाना होत होती. यादरम्यान धावत्या ट्रेनमध्ये चढत असताना एका प्रवाशाचा तोल गेला. तोल गेल्याने हा प्रवाशी रेल्वेच्या दरवाजाला अडकून फरफटत असताना, कर्तव्यावर असलेले रेल्वे गार्ड जितेंद्र पाल आणि आरपीएफ कॉन्स्टेबल नरसिंह कनोजिया यांनी त्यांना चाकांखाली येण्यापासून वाचवले. प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना गार्डचाही तोल जाऊन ते प्लॅटफॉर्मवर पडले. रेल्वे गार्ड जितेंद्र पाल यांचा तोल गेल्याचे लक्षात येताच आरपीएफ कॉन्स्टेबल नरसिंह कानोजिया यांनी तातडीने त्यांना मागे खेचले. या दोघांमुळे रेल्वे प्रवाशाचा जीव वाचला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल आहे.

रेल्वे गार्डने जीव धोक्यात घालून वाचवले प्रवाशाला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये टिपली गेली असून, सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. रेल्वेगार्ड जितेंद्र पाल आणि आरपीएफ कॉन्स्टेबल नरसिंह कनोजिया यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जितेंद्र पाल यांनी सांगितले की, प्रवाशांना सुरक्षीत ठेवणे हेच आमचे कर्तव्य आहे. प्रवाशांना मी आवाहन करोत की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये धावती ट्रेन पकडू नये. रेल्वे सुरक्षा दलाने सांगितले की, आमचे आरपीएफ कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर आणि सर्तक असतात. अनेकदा आपला जीव धोक्यात घालून, त्यांनी आजपर्यंत शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. रेल्वे गार्ड जितेंद्र पाल आणि आरपीएफ कॉन्स्टेबल नरसिंह कनोजिया यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला आहे.

हेही वाचा -संभाजीराजेंसारख्या नेतृत्वाची गरज, त्यांच्या आंदोलनाला नक्कीच यश येईल - मुश्रीफ

Last Updated : Jun 12, 2021, 10:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details