महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 19, 2021, 10:44 PM IST

ETV Bharat / city

कोरोनाचाचणी न करता मुंबईत दाखल झालेले परप्रांतीय मजून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

आरटी-पीसीआर चाचणी केल्याशिवाय महाराष्ट्राबाहेरील नागरिकांनी येऊ नये असे संकेत रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आज रेल्वे प्रशासनाने कोरोना चाचणी न करता मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांना पकडले.

railway administration caught  passengers traveling without a corona test
परप्रातीयांनों मुंबईत रेल्वेने प्रवेश करत असला तर ही बातमी नक्की वाचा

मुंबई -देशभरामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. यादरम्यान कोरोनाचा प्रसार होऊ नयेत, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. मात्र, तरीही कोरोना चाचणी न करतात शेकडो परप्रांतीय नागरिक मुंबईत दाखल होत आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आज शेकडो परप्रातीय रेल्वे प्रशासनाने पकडले आहेत. यामुळे मुंबईत येत असताना आता आरटी-पीसीआर चाचणी केल्याशिवाय महाराष्ट्राबाहेरील नागरिकांनी येऊ नये, असे संकेत रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

रेल्वेने कसली कंबर

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 'ब्रेक द चेन' अंतर्गत नियमावली जाहिर केली आहे. नवीन नियमावलीनुसार 1 जून 2021पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरून महाराष्ट्र येणाऱ्या प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे. रेल्वे मार्गाने जाणाऱ्या प्रवाशांनी महाराष्ट्रात प्रवेश होण्याच्या 48 तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. देशातील कोणत्याही भागातून आलेल्या नागरिकाला राज्यातील कडक निर्बंधाचे पालन करणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक परप्रांतीय नागरिक आरटी-पीसीआर चाचणी न करता मुंबईत दाखल होत आहे. याबाबत ईटीव्ही भारतने यापूर्वी वृत्तसुद्धा प्रकशित केले आहे. मात्र, आता अशा प्रवाशांना आळा घालण्यासाठी रेल्वेने कंबर कसली आहे.

पळ काढणाऱ्यांना पकडले

मिळालेल्या माहितीनुसार,आज हावडा एक्स्प्रेसमधून ५०पेक्षा जास्त परप्रांतीय प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उतरले होते. मात्र, हे सर्व प्रवासी स्थानकांतील प्रमुख प्रवेशद्वाराने बाहेर न पडता. या परप्रांतीय प्रवाशांनी उपनगरी स्थानकाच्या फलाटाला जोडणारा पादचारी पुलावरून उपनगरीय स्थानकावर उतरले होते आणि तेथून लोकल पकडून जाणार होते. मात्र, उपनगरीय लोकलच्या फलाटावर कर्तव्यांवर असलेल्या तिकीट तपासनीसांच्या ही घटना लक्षात आली. तत्काळ या सर्व प्रवाशांना तिकीट तपासत आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल विचारणा केली असता यांच्याकडे अहवाल नव्हता. त्यामुळे या सर्व प्रवाशांना आरपीएफ पोलिसांचा ताब्यात दिले आहे. या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी ईटीव्ही भारताला सांगितले, की आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवालाच्या विचारणा करण्यासासाठी या प्रवाशांना तिकीट तपासणीसांनी पकडले होते.

553 कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी -

मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी असल्यामुळे मोठ्याप्रमाणात परप्रांतीय मजूर गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दाखल होत आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारने बाहेर राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य केला आहे. ज्या प्रवाशांकडे कोविड चाचणीचा अहवाल नाहीत, अशा प्रवाशांची कोविड टेस्ट रेल्वे स्थानकांनावर करण्यात येत आहे. मात्र, कोरोना चाचणीला घाबरून अनेक परप्रांतीय मजूर पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. 17 एप्रिल ते 10 मेपर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून 1 लाख 29 हजार 61 प्रवाशांनी तपासणी केली असता, सुमारे 553 कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी आढळून आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details