मुंबई - दक्षिण मुंबईत अम्ली पदार्थ तस्करांच्या घरावर मुंबई पोलिसांच्या अॅन्टी नारकोटिक्स सेलने छापा टाकला. त्यांच्या घरातून 27 लाख 50 हजार रुपये किमतीची एमडी ड्रॅग जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्स तस्कर मोहम्मद नवाज मोहम्मद इजाज शेख (वय 24) याला अटक केली. त्याच्यावर अमली पदार्थ तस्करीची अनेक प्रकरणे दाखल आहेत.
दक्षिण मुंबईत अम्ली पदार्थ तस्करांच्या घरावर छापे; एकाला अटक - mumbai police
दक्षिण मुंबईत अम्ली पदार्थ तस्करांच्या घरावर मुंबई पोलिसांच्या अॅन्टी नारकोटिक्स सेलने छापा टाकला.
27 लाख 50 हजार रुपये किमतीची एमडी ड्रग्ज जप्त-
दक्षिण मुंबईतील बीपी लेनच्या दोन्ही तालकी भागात बुरहानी मंजिल येथे ड्रग्जची मोट्या प्रमाणात सापडली आहे, अशी माहिती अॅन्टी नारकोटिक्स सेलच्या आझाद मैदान युनिटला मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त दत्ता नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय मानसर्वेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे आणि सचिन कदम यांच्या पथकाने बुरहानी परिसरात छापा टाकला. एका खोलीतून 27 लाख 50 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी अमली पदार्थ तस्कर मोहम्मद नवाज मोहम्मद इजाज शेख याला अटक करण्यात आली आहे.