मुंबई -राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी(दि.१५नोव्हें)ला नकार दिला. तसेच या संदर्भातील फेरविचार याचिका एकमताने फेटाळली. यानंतर देशभरात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
राहुल गांधींनी देशाची माफी मागावी; राफेल प्रकरणी भाजप आक्रमक - mumbai BJP news
दादर येथील भाजपच्या मुख्य कार्यालयाबाहेर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात आंदोलन पुकारले असून, कार्यकर्ते आक्रमाक झाल्याचे चित्र आहे.
राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या गोटातून होत आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
राफेलप्रकरणी नरेंद्र मोदींवर झालेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला. यासाठी आज दादर येथे भाजप कार्यलयासमोर निषेध करण्यात आला.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. राहुल गांधी सातत्याने देशाशी खोटे बोलत असून त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.