महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rahul Gandhi Defamation Case : मोदींवर वादग्रस्त टीका प्रकरण, मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दिलासा - राहूल गांधी नरेंद्र मोदीवर टीका

राफेल विमान खरेदी ( Rafale deal controversy ) व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत 2019 मध्ये मानहानीचा खटला ( Defamation Case Against Rahul gandhi ) दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधी ( Mumbai High Court On Rahul Gandhi Defamation Case ) यांना दिलासा दिला आहे.

Rafale deal controversy
Rafale deal controversy

By

Published : Dec 16, 2021, 3:59 PM IST

Updated : Dec 16, 2021, 4:35 PM IST

मुंबई -राफेल विमान खरेदी ( Rafale deal controversy ) व्यवहारावरुनपंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याचा आरोप करत राहुल गांधींविरोधात मुंबईत 2019 मध्ये मानहानीचा खटला ( Defamation Case Against Rahul gandhi ) दाखल करण्यात आला होता. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले होते. तसेच राहुल गांधींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. याप्रकरणी दाखल झालेली तक्रार रद्द करण्यासाठी राहुल गांधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात( Mumbai High Court On Rahul Gandhi Defamation Case ) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा देत पुढील सुनावणी 18 जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. तसेच गिरगाव दंडाधिकारी कोर्टाला याप्रकरणी 25 जानेवारीपर्यंत सुनावणी न घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

  • मोदींची प्रतिमा मलिन केल्याचा आहे आरोप -

राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ, ( Rahul Gandhi Commander In Thief Remark ) चौकीदार चोर है (Caukidar hi chor hai) , चोरो का सरदार' ( Choroka Sardar ), अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टीची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपाचे कार्यकर्ते महेश श्रीमाळ यांनी ही तक्रार (Mahesh Shrimal File Case Against Rahul Gandhi ) दाखल केली होती. राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या वक्तव्यांचा या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपाचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असे मत व्यक्त करत या गिरगाव दंडाधिकारी कोर्टाने याची दखल घेत राहुल गांधींच्या नावे समन्स जारी केले होते. याशिवाय राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.

  • काय आहे प्रकरण -

20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी 'गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है', असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्वीट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक मानहानीकारक विधानं करत भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाल्याचा दावा, या तक्रारीतून करण्यात आला. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत, अशी विधान करून राहुल गांधींनी भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे, असा दावा या याचिकेतून करत महेश हुकूमचंद श्रीमळ यांनी मानहानीची तक्रार दाखल केली होती.

हेही वाचा - Bullock Cart Race Maharashtra : बैलगाडा शर्यतींचा 'धुरळा' उडणार; सर्वोच्च न्यायालयाची सशर्त परवानगी

Last Updated : Dec 16, 2021, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details