मुंबई - संजय राऊत यांच्या अटकेनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. जे झुकणार नाहीत, केंद्र सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना त्रास दिला जाईल, पण शेवटी सत्याचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी संजय राऊत (Rahul Gandhi on Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर दिली आहे.
Rahul Gandhi : तानाशाह सुन ले, अंत में....; संजय राऊतांच्या अटकेवर राहुल गांधींचा मोदींवर निशाणा - संजय राऊत अटकेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया
जे झुकणार नाहीत, केंद्र सरकारच्या विरोधात बोलतील त्यांना त्रास दिला जाईल, पण शेवटी सत्याचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी संजय राऊत (Rahul Gandhi on Sanjay Raut) यांच्या अटकेनंतर दिली आहे.
राहुल गांधी
संजय राऊत यांना ईडी कोठडी -शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. यावेळी त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत घरचे जेवण देण्याची न्यायालयाची परवानगी दिली आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ( PMLA court) सुणावनी झाली. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांना अटक केल्यानंतर आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.