महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राधाकृष्ण विखे पाटलांचा अखेर आमदारकीचा राजीनामा, पक्षात घुसमट होत असल्याचा केला आरोप

राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला.

राधाकृष्ण विखे पाटील

By

Published : Jun 4, 2019, 1:15 PM IST

Updated : Jun 4, 2019, 2:39 PM IST

मुंबई- राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. ते आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील

माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, काँग्रेस आमदार भारत भालके आणि आमदार जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार आणि शिवसेनेचे नारायण पाटील यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर बैठक पार पडली. वरील सर्व नेते आता मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

8 ते 10 आमदार भाजपच्या संपर्कात - अब्दुल सत्तार

काँग्रेसचे 8 ते 10 आमदार हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. राज्यातील काँग्रेसच्या नेतृत्वावर आमदार नाराज असल्याने ते भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पराभवाच्या धक्क्यात आहे. कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे. अशात आता राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसच्या ३ आमदारांची विखेच्या घरी बैठक झाली. त्यामुळे हे आमदार काँग्रेस सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली आहे. सुजय विखे पाटील हे भाजपत गेल्याने राधाकृष्ण विखे पाटीलही भाजपत जातील, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. ती शक्यता आता खरी ठरली आहे.

Last Updated : Jun 4, 2019, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details