मुंबईलम्पी आजारामुळे राज्यातील ४२ जनावरांचा मृत्यू झाला Lumpy Skin Disease असून राज्याताली २ हजार ६०० जनावारांना लम्पीची लागण झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil यांनी दिली आहे. राज्यातील अकोला, जळगाव, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यातील जनावरांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. या रोगाचा प्रादूर्भाव प्रचंड वेगाने वाढला असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारने आता लम्पी आजारावरील सर्व लसी मोफत देण्याबरोबर इतरही औषध उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे कोणत्याही परिसरात या रोगाची माहिती असल्यास शासकीय रुग्णालयांना कळवण्याच्या सुचनाही शेतकऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे. मुंबई ते बोलत होते.
Radhakrishna Vikhe Patil लम्पी चर्म रोगावर शासनाकडून, लसीसह सर्व औषध उपचार मोफत; पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांच्या सूचना - पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil लम्पी आजारामुळे राज्यातील ४२ जनावरांचा मृत्यू झाला Lumpy Skin Disease असून राज्याताली २ हजार ६०० जनावारांना लम्पीची लागण झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील Radhakrishna Vikhe Patil यांनी दिली आहे. राज्यातील अकोला, जळगाव, अमरावती, बुलढाणा, अहमदनगर व पुणे या जिल्ह्यातील जनावरांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
![Radhakrishna Vikhe Patil लम्पी चर्म रोगावर शासनाकडून, लसीसह सर्व औषध उपचार मोफत; पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांच्या सूचना Radhakrishna Vikhe Patil](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16359968-1093-16359968-1663065002479.jpg)
जिल्हाधिकारी, आयुक्तांना अधिकार राज्यात 75 लाख लस उपलब्ध होणार असून ६ लाख पशुंच लसीकरण झालं आहे. अंदाजे पावणे दोन कोटी पशुधन राज्यात असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. तसेच लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये व जनावरांचे मृत्यू होऊ नये यासाठी टास्क फोर्स सुद्धा निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. Agriculture News उपचाराबाबत सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे दिले असल्याचे सांगत शहरी भागात हे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले आहे.
ठाकरे यांना सत्ता गेल्याचे दुःख मागील अडीच वर्षे माझी कुटुंब तुमची जबाबदारी या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार विशेष करून उद्धव ठाकरे वागत होते अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रसंगी केली आहे. सत्ता गेल्याचे दुःख सहन होत नाही असे सांगत मागील अडीच वर्ष स्वतःसाठी सत्ता राबवली. Farmers News त्या कारणाने आता ही अवस्था झाल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रसंगी केली आहे.