महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Purchase of vehicles : गुढीपाडव्या निमित्त राज्यात 15 हजारपेक्षा जास्त वाहनांची खरेदी; राज्य सरकारच्या तिजोरीत 78 कोटीचा महसूल जमा

यंदा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यात नव्या आणि जुन्या अशा 15 हजार 109 वाहने खरेदी ( Purchase of 15 thousand vehicles ) केली आहेत. ज्यातून परिवहन विभागाला 78 कोटीचा महसूल मिळालेला आहे

By

Published : Apr 5, 2022, 8:19 PM IST

vehicles
vehicles

मुंबई: मुख्यतः हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक जण नवीन वाहने खरेदी करतात. परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे लोकांनी कमी खरेदी केली होती. मात्र, यंदा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यात नव्या आणि जुन्या अशा 15 हजार 109 वाहने खरेदी ( Purchase of 15 thousand vehicles ) केली आहेत. ज्यातून परिवहन विभागाला 78 कोटींचा महसूल ( 78 crore revenue deposited ) मिळाला आहे.



58 टक्के अधिक वाहनांची नोंदणी - कोरोनाच्या निर्बंधातून मुक्त झाल्यानंतर यंदा गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहने ( occasion of Gudipadva ) खरेदी केली आहेत. 1 एप्रिल 2022 आणि 2 एप्रिल 2022 या दोन दिवसात राज्य भरातील आरटीओमध्ये जुन्या आणि नवीन 15 हजार 109 वाहनांची नोंदणी ( Registration of 15109 vehicles ) झाली आहे. याच कालावधी गेल्या वर्षी 9 हजार 529 वाहनांची नोंदनी करण्यात आली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन दिवसात 58 टक्के अधिक वाहनांची नोंदणी झाल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे. 15 हजार 109 वाहनांपैकी 11 हजार 429 वाहनेही पेट्रोलवर धावणारी आहेत.



नागरिकांनी इलेक्ट्रिक वाहनाकडे फिरवली पाठ -प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विद्युत वाहने खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. मात्र इलेक्ट्रिक कार आणि दुचाकीच्या वाढत्या किमती पाहता, आणि पायाभूत सुविधांच्या अभावी इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी खरेदीला यावर्षी नागरिकांनी पाठ फिरवली. याबाबतची माहिती आकडेवारीतून समोर येत आहे. राज्यात गुढीपाडवाच्या मुहूर्तावर फक्त 763 इलेक्ट्रिक वाहने खरेदी ( Purchase of 763 electric vehicles ) करण्यात आलेली आहेत.

हेही वाचा -Dilip Walse Patil Reaction : केंद्राची सूडबुद्धीने कारवाई, मात्र राज्य सरकारला धोका नाही - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details