पुणे :विधान भवनासमोरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, अपर मुख्य सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले की,आज पुणे विमानतळासाठीच्या जागेबाबत आज वॉररूम मध्ये चर्चा झाली. पुणे विमानतळासाठी जी नविन जागा करण्याचा निर्णय होता, त्या निर्णयाला केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने विरोध केला होता, तर नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संरक्षण मंत्रालयाने पुरंदर विमानतळाच्या मूळ जागेवर बांधण्यास मान्यता दिली आहे. पुणे विमानतळा बाबत आम्ही मल्टी मॉडेल लोजेस्टिक हब बांधण्याचा विचार करत असून पुणे हे मॅन्युफॅक्चरिंग हब आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार तयार करू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात पुणे विमानतळ आधुनिक करण्याचा आमचा विचार आहे, या संदर्भात आता आमच्याकडे सर्व परवानग्या मिळाल्या असून विमानतळाचे काम पुढे नेण्याचा आणि त्याचे भूसंपादन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.अस यावेळी फडणवीस म्हणाले.
मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या ॲपव अन्य ई- सुविधांचा नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकेल. मुद्रांक विभागाचे कामकाज अधिक कार्यक्षमपणे आणि पारदर्शकतेने करण्यासाठी या सुविधांमध्ये, कामकाजात मानवी हस्तक्षेप कमी करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, अस देखील यावेळी फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले,तंत्रज्ञान हे समताधिष्ठीत असते. तंत्रज्ञानाच्या उपयोगामुळे कार्यक्षमता वाढविण्यासोबत अपप्रवृत्तींनाही आळा घालता येतो. त्यामुळे नवे तंत्रज्ञान वापरताना नागरिकांना कार्यालयात चकरा मारण्याचा त्रास होऊ नये यासाठी महसूल कामकाजात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात. महसूल कामकाजातील सर्व रेकॉर्ड ब्लॉकचेन पद्धतीत आणून जनतेकरिता सुलभता आणण्याचा प्रयत्न करावा. त्यादृष्टीने सुरू करण्यात आलेल्या ई-सुविधा उपयुक्त ठरतील.
पारदर्शकतेमुळे प्रतिमानिर्मिताला चालनामहसूल विभागाशी नागरिकांचा कधीतरी संबंध येतोच. त्यामुळे या विभागाच्या कामकाजात जेवढी पारदर्शकता येईल तेवढी जनतेच्या मनात शासनाविषयी चांगली प्रतिमा तयार होईल. शासनाने घेतलेल्या निर्णयाविषयी अधिकारी-कर्मचाऱ्यांना माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. मुद्रांक विभागाने तयार केलेल्या विविध सुविधांचे परीक्षणही वेळोवेळी केल्यास याचा योग्यप्रकारे उपयोग होऊ शकेल. ई-ॲडज्युडीकेशन सुविधेमुळे कामकाजात पारदर्शकता येईल, असेही फडणवीस म्हणाले. जगामध्ये सर्वात जास्त डिजीटल व्यवहार करणारा आपला देश आहे. देशात असे व्यवहार सुरू होत असताना अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र आता नागरिक ‘पेमेंट गेटवे’चा उपयोग करून व्यवहार करीत आहे, असेही फडणवीस म्हणाले.
शासनाचा नावलौकीक वाढविण्यासाठी जनतेला सुविधा द्या -महसूलमंत्री विखे-पाटील म्हणाले, राज्याला पुढे नेताना मुद्रांक विभागामार्फत अत्यंत कल्पकतेने आणि विचारपूर्वक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. महसूल विभागाने संगणकीकरणाचे धोरण राबवून जनतेला अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. झपाट्याने नागरिकीकरण वाढत असताना आणि नागरिकांकडून महसूल एकत्रित होत असताना कार्यालयात येणाऱ्या नागरिक आणि कर्मचाऱ्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. शासनाचा नावलौकीक वाढविण्यासाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अशा सुविधा महत्वाच्या आहेत.