मुंबई - अहिल्यादेवी होळकर Ahilyabai Holkar यांचा जन्म ३१ मे इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील Ahmednagar District जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्यावाचण्यास शिकवले होते. भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' Philosopher Queen म्हणून त्या ओळखल्या जात होत्या. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केले होते. त्याआधारे अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, ( १३ ऑगस्ट, १७९५ ) म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. अशा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची १३ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी Ahilyadevi Holkar Punyatithi आहे.
वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले -धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या मुलाशी, 'खंडेरावांशी' झाले. कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सूनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार ते अहिल्याबाईंवरच सोपवीत असत. खंडेरावांपासून त्यांना मालेराव व मुक्ताबाई ही दोन अपत्ये झाली. अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले. पती खंडेराव Khanderao कुंभेरी Kumbheri येथे लढाईत मरण पावले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या. पण सासरे म्हणाले, “प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये. हे राज्य सांभाळायचे आहे.