मुंबई -साकिनाका येथील महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार मानवतेला कलंक फासणारा आहे. याप्रकरणी दोषी आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
'प्रकरणी जलद गती न्यायालयात चालवा' -
अंधेरी साकिनाका येथे बलात्कार करून अमानुष मारहाण झालेल्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज तिचे दुःखद निधन झाल्याचे कळताच रामदास आठवले यांनी राजावाडी रुग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांची भेट घेतली. दरम्यान, तोपर्यंत पीडित महिलेचे पार्थिव जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी याप्रकरणी जलद गती न्यायालयात खटला चालवून 6 महिन्यात आरोपींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी केली.
हेही वाचा - Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
'पीडितेला 10 लाख रुपयांची मदत करावी' -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे. महिलांवर होणारे अत्याचार रोखवेत आणि साकिनाका येथे महिलेवर झालेला अमानुष अत्याचार बलात्कार प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी उद्या साकिनाका पोलीस ठाणे येथे रिपब्लिकन पक्षाच्यावतीने निषेध निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. तसेच पीडित मृत महिलेच्या कुटुंबियांना राज्य शासनाने सांत्वनपर 10 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली आहे.
हेही वाचा -Saki Naka Rape Case: बलात्कार प्रकरणात एकच आरोपी, नराधमाला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी