मुंबई - पुणे एमआयडीसी जमीन गैरव्यवहार (Pune plot scam case ) प्रकरणात मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश नितीन सांबरे यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम ठेवला आहे. (Mandakini Khadse granted relief by mumabi High Court) या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आता पुढील सुनावणी १२ जानेवारी रोजी होणार आहे.
Pune plot scam case : मंदाकिनी खडसे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, 12 जानेवारीला पुन्हा सुनावणी - (Eknath Khadse Pune plot scam case)
मुंबई उच्च न्यायालयाने मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse granted relief by mumabi High Court) यांना दिलासा दिला आहे. पुणे एमआयडीसी जमीन गैरव्यवहार (Pune plot scam case) प्रकरणात मंदाकिनी खडसे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश नितीन सांबरे यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणीत न्यायालयाने मंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम ठेवला आहे.
Pune plot scam case
मागच्या सुनावनी दरम्यान मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse Pune plot scam case)यांना प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याबाबतचे आदेश न्यायालयाने मागे घेतले होते. या प्रकरणात खडसे याचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2017 मध्ये एकनाथ खडसे, त्यांची पत्नी मंदाकिनी, जावई गिरीश चौधरी आणि मूळ जमीन मालक अब्बास अकानी यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. खडसे आणि इतरांनी पुण्याजवळील एमआयडीसीमधील मुख्य भूखंड खरेदीत (Pune plot scam case) कथित अनियमितता केल्याप्रकरणी हे प्रकरण आहे.
भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणात (Eknath Khadse Pune plot scam case) खडसेवर झालेल्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Last Updated : Dec 21, 2021, 4:42 PM IST