मुंबई - सोशल मीडियावर सरकारविरोधी मत व्यक्त केल्याने एफटीआयआयचे प्राध्यापक इंद्रनील भट्टाचार्य यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली ( FTII Professor Suspended Social Media Post ) होती. या निर्णयाला भट्टाचार्य यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सोशल मीडियावर सरकारविरोधी मत व्यक्त केल्याने प्राध्यापकाचे थेट निलंबनाच्या आदेशाचा फेरविचार करत एफटीआयआयच्या अध्यक्षांना संचालकांच्या चौकशीचेही आदेश उच्च न्यायालयाने दिले ( High Court Order Enquiry Professor Suspended ) आहेत.
या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती एस. बी. शुक्रे आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सोशल मीडियावर सरकारविरोधी मत व्यक्त केले म्हणून प्राध्यापकांना निलंबित करण्याचा अधिकार आणि आदेश कसा दिला?. सकृतदर्शनी हे आदेश बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे असे थेट निलंबनाचे आदेश देणाऱ्या संचालकाची चौकशी सुरू करावी. तसेच, अध्यक्षांना या आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल सादर करण्यास सांगत उच्च न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.