मुंबई - मुंबई पुणे जुन्या हायवे वरील टोल वसुली विरोधात मुंबई उच्च न्यायालयात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अॅड. प्रवीण वाटेगावकर यांनी आज जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे जुन्या हायवे वरील टोल प्लाझा च विरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. हायवे वरील सोमाटणे आणि वरसोली येथील टोल प्लाझा अवैध असल्याचा दावा याचिकाकर्ते यांनी याचिकेत केला आहे.
Mumbai HC : मुंबई पुणे जुन्या हायवेवरील टोल वसुली विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
याचिकेत राष्ट्रीय महामार्ग 48 च्या मुंबई-पुणे येथील सोमाटणे फी प्लाझावरील शुल्क/टोल वसुलीला आव्हान दिले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन शुल्क/टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटरच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे याचिकेत म्हटले आहे.
नियमाचे उल्लंघन करून टोल वसुली केली जात असल्याचा याचिकाकर्त्यांनी दावा केला आहे. याचिकेची एक प्रत केंद्र सरकारकडे पाठवली असल्याची याचिकाकर्त्यांचे माहिती दिली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी मागणीदेखील याचिकाकर्त्यांनी केली आहे.
याचिकेतील प्रमुख मुद्दे
याचिकेत राष्ट्रीय महामार्ग 48 च्या मुंबई-पुणे येथील सोमाटणे फी प्लाझावरील शुल्क/टोल वसुलीला आव्हान दिले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन शुल्क/टोल प्लाझांमधील किमान अंतराच्या 60 किलोमीटरच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे याचिकेत म्हटले आहे. राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर आणि संकलनाचे निर्धारण) नियम, 2008 द्वारे अनिवार्य केले आहे. वरसोली फी प्लाझा (लोणावळा) आणि सोमाटणे (देहू रोड) फी प्लाझामधील वास्तविक अंतर फक्त 31 किमी एवढे असल्याचे म्हटले आहे. नियमांनुसार महानगरपालिका किंवा नगर क्षेत्राच्या हद्दीपासून 5 किलोमीटर अंतराच्या हद्दीत टोल प्लाझा स्थापन करण्यास मनाई आहे. सोमाटणे टोल प्लाझा तळेगाव दाभाडे महानगरपालिकेच्या लिंब फाट्यापासून सुमारे ३.५ किलोमीटर अंतरावर आहे. याचिकेत राष्ट्रीय महामार्ग 48 वरील सोमाटणे येथे टोल प्लाझा, मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात याव्यात सोमाटणे प्लाझावर फी/टोल वसूल करण्यापासून कंपनीला प्रतिबंधित करावे, असं वकील प्रवीण वाटेगावकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -Devendra Fadnavis On ED Inquiry : केंद्रीय तपास यंत्रणा कधीही चुकीची कारवाई करणार नाही - देवेंद्र फडणवीस